मलकापूर:- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना दि. 28/06/2024 च्या शासननिर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे व त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळण्यास महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे, वयाची किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, लाभार्थ्यांचे उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. सदर योजने करिता लागणारे अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला हा तहसिल कार्यालयामधुन देण्यात येतो. या करिता सर्व नागरिक 100 रु. च्या बॉन्डसाठी गर्दी करीत आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र 01/07/2004 नुसार क्रमांक मुद्रांक 2004/1636/प्र.क्र.436/म.-1 मुंबई मुद्रांक अधिनियम, 1958 (1958 च्या मुंबई 60) च्या कलम 9 च्या खंड (अ) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव तसे करणे आवश्यक आहे अशी खात्री पटल्यामुळे महाराष्ट्र शासन याव्दारे जात प्रमाणपत्र/उत्पन्न प्रमाणपत्र/वास्तव्य प्रमाणपत्र/राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचेसमोर दाखला करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर उक्त अधिनियमाच्या अनुसुची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणेयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे. असा आदेश यापुर्वी झाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला या करिता मुद्रांक शुल्क माफ आहे. त्यामुळे 100 रु. स्टॅम्प ची गरज नाही. असे आवाहन तहसिलदार राहुल तायडे व उपविभागीय अधिकारी मलकापुर संतोष शिंदे यांनी केले आहे.