Headlines

व्याजाच्या पैशासाठी घरी चकरा मारत होते,सावकाराच्या जाचाला कंटाळून शालेय कर्मचाऱ्याने विष घेतले,पाच दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यू; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून शालेय कर्मचाऱ्याने विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, 18 जून रोजी घडली. चैनसिंग चव्हाण (वय 55, रा. वृंदावन नगर भाग 4) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये नमूद केले की, काही दिवसांपासून वारंवार व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने चैनसिंग चव्हाण यांनी विष प्राशन केले. या दरम्यान त्यांना खासगी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू असताना आज दुपारी तीन वाजता प्रकृती खालावल्याने त्यांच्या मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रामेश्वर पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, स्वप्निल भगत यांच्यासह इतर 8 ते 9 जणविरुद्ध कलम, 293/024 कलम 306, 341, 504, 506, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सर्व आरोपी फरार असुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी काही लोक चैनसिंग चव्हाण यांच्या घरी व्याजाच्या पैशांसाठी फेऱ्या मारत होते. या दरम्यान ते शिवीगाळ व धमक्या देत असत. त्यामुळे सावरकरांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून चव्हाण यांनी आत्महत्या केली. याबाबत दोन दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी तात्पुरती तक्रार घेतली. दुसऱ्या दिवशी चव्हाण यांची बुलडाणा येथे प्रकृती खालावली. या दरम्यान काही नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत संपर्क केला. त्यामुळे मलकापूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केल्याची कारवाई केली. परंतु अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही, असे चव्हाण यांच्या मुलाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!