मलकापूर : येथील बन्सीलाल नगर परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील बन्सीलाल नगर, संत एकनाथ मार्ग परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी तीन घरफोड्या झाल्याची घटना सोमवार, ८ जुलै रोजी घडल्या. यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण त्रंबक पारसकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी पाहता चोरट्यांनी दागिने , टीव्ही, रोख रक्कम लंपास केली. ही घटना सकाळी शेजारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घरमालकास माहिती दिल्यानंतर उघडकीस आली. एकीकडे सुरक्षा रक्षकांच्याच कार्यालयातील मुद्देमाल चोरीला जात असेल तर नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरच असल्याचे दिसून येत आहे. या घटनेची माहिती घरमालकाने दिल्यानंतर दुपारी पोलीस निरीक्षक अनिल गोपाल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत चोरट्यांचा शोध घेऊन या भागातील पोलीस पेट्रोलिंग वाढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. चोरीच्या घटनांनी मलकापूर शहर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. यावर गांभीर्याने विचार करून उपाय योजना करणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असून त्यांनी ते पार पाडावे, अशी नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.