मलकापूर :- 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे 33 के व्ही बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती .यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्र पासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खंबे जमीन दोस्त झाले होते.वीस ते पंचवीस दिवस उलटून सुद्धा शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र अभियंता यांच्या निष्काळचेपणामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसानीचा फटका बसत आहे याच त्रासाला कंटाळून आज शेतकऱ्यांनी संभाजी शिर्के यांना सोबत घेऊन महावितरण मध्ये ठिय्या केला व महावितरण ला टाळे ठोकले. आपल्या विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बेलाड उपकेंद्र येथे आपल्या व्यथा मांडल्या.
पेरणीच्या तोंडावर महावितरण चे धीम्या गतीने चालू असलेल्या कामावर शेतकऱ्यांनी ताशेरे ओढत महावितरणच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले व आपल्या शेता पर्यंत कधी सुरळीत वीज पोहोचेल याची ग्वाही त्यांच्याकडून बोलून घेतली संबंधित अधिकारी यांनी येत्या सहा ते सात दिवसात सर्व शेतातील बीज सुरळीत होईल अशी ग्वाही दिली यामध्ये विशेष संभाजी शिर्के यांची उपस्थिती होती 40 पैकी 25ते 30 डीपी वरील लाईट आज व उद्या सुरडीत सुरु होईल तसेच अन्य लाईट चार ते पाच दिवसात सर्व व्यवस्थित होईल ही ग्वाही घेतल्यानंतर कुलूप उघडले. तसेच हे काम दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केल्या जाईल असा सज्जड इशारा सुद्धा दिला…..तसेच बेलाड, घिर्णी, माकणेर, बाहापुरा,पान्हेरा, वाघूड या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.