मलकापूर :- मागील वर्षी खरीप चा 39,000 शेतकऱ्यांनी तर रब्बीचा 7,000 शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून त्या जवळपास 25,000 शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे व तो मंजुरी झालेला आहे तरीही ती पिक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक केव्हा टाकणार याची शाश्वती नाही मागील कित्येक दिवसापासून AIC पिक विमा कंपनीच्या तालुक्या प्रतिनिधी सोबत वारंवारता संबंधित चर्चा करून पैसे केव्हा येतील याची विचारणा केली असता आठ दिवसात दहा दिवसात येता फक्त हे उत्तर मिळत आहे बुलढाणा, चिखली, मेहकर या तालुक्यात बहुतेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असून आपलाच तालुक्यात दिरंगाई का होत आहे याचे विचारणा करून आज AIC पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले व त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज दोन तास डाबून ठेवले त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलून पुढच्या आठवड्यात पिक विमा चे पैसे टाकतो असे सांगितले येत्या आठवड्यात पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास समस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल असाही दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, शिवाजी हिवाळे, गौरव वराडे, हर्षल मोरे हे शेतकरी हजर होते.