मलकापूर :- शहरातील गणपती नगर भाग 3 मध्ये राहत असलेल्या शिक्षकाचे घर फोडून कपाटातील रोख रक्कम व दाग दागिन्यासह एकूण एक लाख 16 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.12 जून ते 16 जून दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी शिक्षक हरिओम जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारी म्हटले आहे की ते गणपती नगर भाग 3 मध्ये भाड्याने रूम करून राहतात. फिर्यादी हे वडगाव माळुंगी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेला सुट्टी असल्याने फिर्यादी हे त्यांच्या मूळ गावी लिहा.ता. मोताळा येथे सुट्टी मनवण्यासाठी दि. जून 12 ते 16 जून रोजी गेले होते. फिर्यादी शिक्षक यांच्या पत्नीच्या मोबाईलवर सकाळी शेजारच्यांचा फोन आला त्यांनी सांगितले की तुमच्या घराचे मागील दार उघडे आहे तुम्ही लवकर घरी या असे शेजारच्या लोकांनी सांगितले. फिर्यादी व त्यांच्या पत्नी यांनी घरी येऊन पाहिले असता घराचा दरवाजा तुटलेला दिसला घरातील सामान ही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरातील कपाटचे लॉक तुटलेले होते. कपाटात ठेवलेले
1.एक 26.970 ग्रॅम वजनाची किंमती 91,342/- रु सोन्याची पोत, 2. एक ग्रॅम सोन्याची अंगठी किंमती 5808/- रु व 3. एक ग्रॅम सोन्याच्या मणगट्या 4120/-रु व नगदी 15,000/-रु असा एकूण 1,16,270/-रु चा मुददेमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अश्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.