मलकापूर:- अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी स्वामी नामाने चिंता मिटतात, असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून, ती समजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते याच धरतीवर स्वामी भक्तांनी गुरू पौर्णिमेला स्वामींना गुरू मानून असंख्य महिला व पुरुषांनी गुरुपद स्वीकारले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील मधुमालती नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात महिला व पुरुषांची दर्शनासाठी असंख्य गर्दी दिसून आली. मधुमालती नगर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. या केंद्रात दररोज असंख्य महिला व पुरुष दर्शनासाठी येत असतात. काल झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील ेवेकर्यांनी स्वामी महाराजांना गुरु मानून, श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वच आहात आपणच आज पासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुत्व स्वीकारून आमचा योग्यक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा अशा भावना व्यक्त करून गुरुपद स्वीकारले.
आज भल्या पहाटेपासून केंद्रात लगबग दिसत होती. सकाळी स्वामी समर्थ महाराजांचे षडशोपचार पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवद्य आरतीची सेवा सर्व सेवेकऱ्यांनी रुजू केली. या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मलकापूर शहर व तालुक्यातून सेवेकरी मोठ्या संख्येने आले होते. आज पहाटे पासून मोठया प्रमाणात केंद्रात गर्दी झाली असली तरी सर्व सोहळा शिस्तीत पार पडला. अबालवृद्ध सेवेकरी शांततेत रांगेत येऊन श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीला अभिषेक करून, पुष्प अर्पण करून चरणतीर्थ घेऊन समर्थाना विनंती करत होते, “महाराज आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. माझा सांभाळ करा.” सर्वत्र महिला पुरुष सेवेकऱ्यांनी केंद्रात व आपापल्या घरी आज श्री स्वामी चरित्र सारामृत, तेजोनिधी या ग्रंथाची पारायण केले. स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.