मलकापूर: भरधाव ट्रक आणि चारचाकीचा वाहनाची समोरासमोर धडक झाली ही घटना दि. 4 जुलै गुरुवार रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर काटी फाट्यानजीक ४.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कल्याण टोल कंपनीच्या वतीने गुरुवारी सकाळ पासून रस्त्यावर कलर पट्टे मारण्याचे काम चालू होते यासाठी एकतर्फी वाहतूक वळविण्यात आली होती दरम्यान नागपूरवरून अहमदाबादकडे जाणारा ट्रक क्रमांक जिजे-२५, यु- ५०९७ व मलकापूरवरून अकोल्याकडे जाणारी चारचाकी क्रमांक एमएच-३०, ए. एक्स-८१९४ या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात चारचाकीच्या समोरील एका बाजुचा अक्षरशः चेंदामेंदा झाला मात्र या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
रस्त्यावर कलर पट्टे मारण्यासाठी अचानक एकतर्फी वाहतूक वळविण्यात आल्याचा फटका वाहनधारकांना बसला आहे. त्यासाठी परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे.