मलकापूर:- उसनवारी पैशाच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 18 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील बिर्लारोड परिसरात घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नांदुरा येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आनंद बबनराव जगदाळे वय 28 वर्ष राहणार सावजी फैल हा मंगळवारी रात्री नऊ वाजता सुमारास बिर्ला रोड वरून सायकलने पुरोहित कॉलनीत जात होता. तेवढ्यात पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले व त्याला उसनवारी घेतलेले पाच हजार रुपयाची मागणी केली. या वादाचे रूपांतर हाणामारी झाली हा वाद विकोपाला जाऊन दुचाकी वरील आलेल्या दोघांपैकी एकाने गळ्यावर चाकू हल्ला करून दोघे दुचाकीस्वार फरार झाले. या घटनेत आनंद बबनराव जगदाळे हा गंभीर जखमी झाल्याने स्थानिकाच्या मदतीने त्याला खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आली.
याप्रकरणी आनंद बबनराव जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश गव्हाणे व मोहित बुरकले या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहेत.