Headlines

किरकोळ वादातून डोक्यात बिअरची बाटली फोडली,दोघे जखमी, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा : येथील शेंदुर्जन मार्गावर असलेल्या छत्रपती हॉटेलवर किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. यामध्ये चार व्यक्तीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये १८ जून रोजी सोनू ऊर्फ साहिल दीपक राजपूत आणि पवन गोपाल सिंग डागोर (रा साखरखेर्डा) हे दुपारी ४:३० वाजता आले. येथील कामगार शैलेंद्र सुधाकर शेळके यांच्यासोबत वाद घालून सोनू राजपूत याने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तर पवन याने लाकडी काठीने मारले. तेरा मालक सागर कहा है! असे म्हणत वादही घातला. शैलेंद्र शेळके यांच्या तक्रारीवरून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सोनू राजपूत यांनी दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे की, शैलेंद्र शेळके आणि सागर डुकरे या दोघांनी मागील जुना वाद उकरून काढून शेतात चारा पाणी करण्यासाठी जात असलेल्या साहिल दीपकसिंग राजपूत यास रोहित वाईन बार समोर अडवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!