बुलढाणा : दुचाकी आणि बॅटरी लंपास करणाऱ्या सराईत तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जून रोजी अटक केली त्यांच्याकडून दोन लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून दुचाकी आणि बॅटऱ्या लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांना विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे कुऱ्हा काकोडा (ता मुक्ताईनगर) येथून आकाशा ऊर्फ संतोष विष्णू रावळकर यास अटक केली तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या तसेच भगवान विश्वनाथ सरदार (रा चतारी) व जगदीश जगदेव हिवराळे (रा बाळापूर) या दोन बॅटरी चोरांनाही पोलिसांनी अटक केली अटक केलेले चोरटे सराईत आहेत या चोरट्यांनी चोरीची कबुली दिली आहे ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे यांच्या नेतृत्वात रवी मोरे, गजानन माळी, दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम अधाव, गणेश
पाटील व इतरांनी केली.