मलकापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परीसरातील माय माऊलींना लाभ मिळवून देण्यासाठी मलकापूर शिवसेना (शिंदे गट) सरसावाला आहे. ५ जुलै रोजी मौजे दसरखेड येथील शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष डीवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करून मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सहकार्याची भूमिका बजावली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळवून देता यावा या अनुषंगाने पात्र लाभार्थी महिलांचे अर्ज भरून देणे, कागदपत्रांची जुळवणी करुन देणे, दाखले मिळवून देणे आदी कामांसाठी खास कक्ष स्थापन करुन जनसेवेचे कार्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी संगणक, भ्रमणध्वनी व तत्सम साधनांची व्यवस्था केली आहे. या योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रांच्या यादीचे फलक, माहितीपत्रके संबंधितांच्या छायाचित्रांसह सर्वत्र झळकवले आहे. उपरोक्त ठिकाणी मदत कक्ष सुरू होताच अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी उसळत आहे.अर्ज भरण्यासाठीचे पोर्टल अद्याप नीटसे कार्यान्वित नसल्याने महिलांचे शिवसैनिकांच्या पुढाकारातून कागदोपत्री अर्ज भरून घेतले जात आहे. नारीशक्ती दूत अॅपमधून ‘स्कॅनिंग’ ला अडचणी येत आहेत. या संदर्भात आपण संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढणार आहोत असे आश्वासन सुद्धा तालुका प्रमुख विजय साठे यांनी दिले आहे. या मदत कक्षाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. या मदत कक्षात शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सह कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुभाष गवली,सुरेश अहीर,विनोद बोदडे,जितु पाटील, राजू महाजन, समाधान साठे, आदेश शिंदे,अनिकेत साठे, सागर मोरे,धनराज पाटिल,आदि पदाधिकारी माता भागिनींचे अर्ज भरुण घेत प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करीत सहकार्याची भूमिका बजवतांना दिसत आहे