पुणे: – कै.सौ पार्वताबाई बाबुराव इंगळे यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत मातोश्री सौ पार्वताबाई इंगळे बहुउददेशीय संस्थेकडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन देहु फाटा, आळंदी,पुणे येथे करण्यात आले होते. या सकारात्मक उपक्रमात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमाला नगरसेवक प्रदीपभाऊ नवले, दिनेश घुले, संदीप आवारे लेखापरीक्षक, अनिल महाराज तापकीर, गजानन खेडेकर,ॲड सोनाजी साटोटे,चंद्रकांत देवकाते, कचरे,श्री ठोंबरे, नितीन महाराज तापकीर, उमेश श्रावणे, बजरंग जाधव, सुरेश श्रावणे, गणेश बावणे,सौ अनिता तापकीर,नागेश जोडतल्ले,अजय शिंदे आदी प्रमुख पाहुने उपस्थित होते. सर्वप्रथम मातोश्री कै सौ पार्वताबाई इंगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत अजय इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य कन्सेप्ट व्हेरिटेज मित्रमंडळ यांचे लाभले तर प्रिंप्री चिंचवड व शिव शंभो रक्तपेढी यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रम यशस्वी ठरला.
कै.सौ पार्वताबाई यांच्या तृतीय पुण्यस्मरण औचित्यावर बजरंग जाधव, ललितकुमार मोरे, गोविंद गव्हाने, सुरज मोगरे, अजय इंगळे, प्रसाद तापकीर आशिष घाडके,जेजेराम आंधळे, विजय आटोळे, चंद्रकांत देवकाते, सुनिल ताठे, डिगांबर पंडीत, घनश्याम भिवरे,ओम कोलते, राजेश बिर्जे, निलेश वाबळे,पवन साठे पाटील, प्रणव सोळंके,मयुर वळसे, वसंत राठोड,आदीत्य माहुरे,शुभम खेडेकर,भारत गराळे,सदाशिव पडळकर,हिमांशु पिंपळे,राजेंद्र इंगळे,बाळकृष्ण चौघुले,साहील बागल,चाणक्य बावकर,लक्ष सोनवणे,बाळकृष्ण इंगळे,प्रणव वाळुज,नरसिंह देशपांडे आंदींनी रकतदानाचे महान कार्य केले
