मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त अशी औद्योगिक भेट ही नुकतीच आयोजित करण्यात आली. ही भेट बेंझोकेमिकल प्रा. लि. तसेच मारुती पॅकर्स प्रा. लि., दसरखेड एम आय डी सी, मलकापूर येथे पार पडली.
या भेटीत महाविद्यालयातील बी.ई. तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील उत्पादन प्रक्रिया, तांत्रिक कौशल्य, यंत्रसामग्रीचे कार्य आणि उद्योगातील व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात व औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक समजुतीत निश्चितच भर पडणार आहे.
या भेटीचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रामकांत चौधरी, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. संतोष शेकोकर यांनी केले. भेट यशस्वी होण्यासाठी विभागातील प्राध्यापक प्रा. सचिन भोळे, प्रा. दीपक खरात, प्रा. सचिन चौधरी, प्रा. आचल गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी उद्योगजगताशी अधिक घट्टपणे जोडले जातात आणि भविष्यातील करिअरसाठी सुसज्ज होतात, असे मत प्राचार्य यांनी यावेळी व्यक्त केले.
