Headlines

पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या १० वर्षीय चिमुकलीला दुचाकी चालकाने फरफटत नेले; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- पेपर देऊन शाळे बाहेर दुकानात गेलेल्या चिमुकल्या मुलीला दुचाकी चालकाने फरफटत नेत अपघात झाल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास नूतन इंग्लिश स्कूलच्या गेट समोर घडली. या अपघातात 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्कूल मधील शिक्षक घटनास्थळी पोहचून त्या विद्यार्थिनीला खाजगी रुग्णालयात दाखल केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की भाग्यश्री राजेंद्र नाईक वय 10 वर्ष रा. विष्णू नगर ही चिमुकली नूतन विद्यालय येथे वर्ग 5 ला शिक्षण घेते. ती नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत गेली. शाळेत पेपर दिला आणि भूक लागली असल्याने शाळे बाहेर असलेल्या दुकानात बिस्कीट पुडा आणायला गेली असता भरधाव वेगाने व निष्काळजी पणे दुचाकीने येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीत चिमुकलीचा ड्रेस अडकला व तिला दूर पर्यंत फरफटत नेले. या घटनेत चिमुकल्या भाग्यश्री ला डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती शिक्षकांना मिळताच त्यांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

एकाच मार्गावर तीन शाळा आहेत. तिन्ही शाळा सुटण्याचा एकच वेळ असल्याने त्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. या मार्गाने तरुण मुले सुसाटपणे गाड्या पळवत असतात त्यामुळे शाळे समोरे गतिरोधक असणे गरजेचे असल्याचे शिक्षकांनी विदर्भ लाईव्ह कडे बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!