खामगाव : खामगाव शहरापासून
जवळच असलेल्या सुटाळा बु, येथे एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.12 जुलै शुक्रवारला उघडकीस आली. रवी महादेव कळसकार वय ( 35 )असे मृत इसमाचे नाव आहे.सदर इसम सुटाळा बु. याठिकाणी वास्तव्यास होता, त्याने अचानकपणे असे आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलेले याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.सदर व्यक्तीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा शोध शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.