शोेगाव : तालुक्यातील वानखेड येथील ५० वर्षीय इसम २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता शेतात मोटर बंद करण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना येथील साईबाई मोटे सामुदायिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा सतीश परसराम मोटे यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले आहे.