Headlines

शेगावच्या मोदी नगरातून दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

 

शेगाव : येथील मोदी नगरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.याबाबत जगदीश प्रकाश घाटोळकर (वय ३६, रा. मोदी नगर, बाळापूर रोड, शेगाव) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली की, त्याने नेहमीप्रमाणे दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली होती. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता, त्याची आई दार उघडून बाहेर गेली असता, तिला घरासमोर दुचाकी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी घराच्या आजुबाजूला शोध घेतला, परंतु मोटार सायकल मिळून आली नाही. तसेच गावातही शोध घेतला, मात्र दुचाकी सापडली नाही.फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक एम. एच. २८-एसी-८८४९, ज्याची अंदाजे किंमत १४ हजार रुपये आहे, ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तोंडी रिपोर्टच्या आधारावर पोलिसांनी कलम ३०३(२) भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!