शेगाव: तालुक्यातील टाकळी नागझरी शिवारात गाईच्या चोरीची घटना समोर आली आहे. आशिष पांडुरंग कराळे यांच्या शेतात बांधलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
ही घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कराळे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.