मलकापूर( दिपक इटणारे ):- गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांच्याच मनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सार्वजनिक उत्सवात नवतरुण पिढीला संदेश दायक देखावे तयार करणे हाच उत्सवाचा खरा उद्देश आहे. असाच सुंदर असा देखावा मलकापूर शहरातील श्री शिवाजी गणेश मंडळ बाजीप्रभू नगर व कीर्ती गणेश मंडळ किल्ला चौक बारादारी यांनी आपल्या मंडळामध्ये उत्कृष्टरित्या सजावट करून देखावा निर्माण केला आहे.
श्री शिवाजी गणेश मंडळ, बाजीप्रभू नगर मंडळाच्या वतीने कापसाने बनवलेली पृथ्वी तयार केली आहे व त्यावर लाकडी खांब असून त्या कापसाने बनवलेल्या पृथ्वीवर शंकरजी व पार्वती माता उभ्या आहेत. शंकरजीने डाव्या हात त्या खांबावर ठेवून उजव्या हातात डमरू वाजवताना दिसत आहेत तर पार्वती माता उजवा हात शंकरजीच्या हातावर ठेवून आहेत तर गणपती बाप्पा, शंकरजी व पार्वती मातेच्या हातावर उभे राहून आहेत. ती कापसाने बनवलेली पृथ्वी मागील बाजूने बनवलेले आकाश त्या भोवती फिरताना दिसून येत आहे. तर कीर्ती गणेश मंडळ, बारादारीच्या वतीने गुफा तयार केली आहे. गुफेच्या प्रवेशद्वारावरच महादेवाचे आकर्षक मूर्ती आहे. तर आजूबाजूने उंबराच्या झाडांच्या फांद्या लावलेल्या आहेत व त्यामागे गणपती बाप्पांची आकर्षक भव्य मूर्ती आहे. मलकापूर शहरात या दोन्ही मंडळाच्या उत्कृष्ट देखाव्याने संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष वेधले असून दररोज या मंडळांना हजारो भाविक भेट देऊन जात आहेत. हे दोन्ही देखावे मलकापूर शहरात आकर्षक ठरत आहे.