Headlines

इलेक्ट्रिक कॉपर तार चोरणाऱ्या चोरट्याला आरपीएफ पथकाने केली अटक, शेगाव येथील घटना!

शेगाव : शेगांव रेल्वे स्टेशन जवळील सिनियर सेक्शन इंजिनियरिंग इलेक्ट्रिक कार्यालय येथून अज्ञात चोरट्याने रेल्वेची इलेक्ट्रिक विभागाची कॉपर तार चोरून नेल्याची घटना २ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी शेगाव येथून जवळच असलेल्या एक फळ येथून सागर गुरुदीन परदेसी या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा आरपीएफ कस्टडी रिमांड घेण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाईट ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी कैलास अजबराव शेगोकार यांनी आरपीएफ पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने २ ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान इलेक्ट्रिक विभागाच्या बंद असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक विभागात असलेली जुनी कॉपर वायर किंमत अंदाजे ८०००/- रू. कंडक्टर रिलीज (जुना) कॉपर वायर १० MM ६० मीटर किंमत अंदाजे ६०००/- रू. एकूण अंदाजीत किंमत १४,०००/- रू रेल्वे संपत्ती चोरून नेली याप्रकरणी आरपीएफ पोस्टे. शेगांव येथे गुन्हा रजि. न.०१/२०२४ दि ०२/०८/२०२४ कलम ३ (A) RP (UP) ACT १९६६ संशोधित – २०१२ सोबत कलम १४७ रेल अधिनियम १९८९ संशोधित २००३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *