मलकापूर ( उमेश इटणारे ) :- सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने सुद्धा 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मलकापूर नांदुरा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश एकडे यांना उमेदवारी देण्यात आले. मात्र विद्यमान आमदार यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने काँग्रेस मध्ये फूट पडल्याची चित्र आहे. आंदोलन सम्राट म्हणून ज्यांची मलकापूरच न्हवे तर संपूर्ण जिल्हाभरात ओळख असलेले माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ बंडखोरी करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. सोमवार दि.28 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. माजी नगराध्यक्ष अँड रावळ हे संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन सम्राट म्हणून परिचित आहेत. हरीश रावळ यांनी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक आंदोलने करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावलेल्या आहेत. परंतु आता आंदोलन सम्राटांना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याना विधानसभेत आवाज उठवायचा असल्याने, येत्या 28 ऑक्टोंबर ला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रावळ यांनी केले आहे. हरीश रावळ अपक्ष लढणार असल्याने काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल व विद्यमान आमदार राजेश एकडे यांना ते अडसर ठरतील एवढं मात्र नक्की खरं आहे. काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती हे समजणे कठीण झाले आहे. येत्या निवडणुकीत हरीश रावळ यांच्या बंडखोरीने समीकरण बदलण्याची संकेत आहे.