मलकापूर: बारावी नंतर फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ वेलफेअर असोसिएशन मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. फार्मसी शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. फार्मसी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. फार्मसी जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करावी. अधिक क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य ठरतं.
फार्मसी च्या प्रवेशा करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे अगोदर च तयार ठेवावी जेणेकरून फॉर्म भरण्याची वेळी विद्यार्थी व पालकांना अडचण येणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी स्टाफ असोसिएशन कमिटी सोबत संपर्क साधावा. यामध्ये डॉ. ठेंगे, प्रा पोपट, प्रा दारखे आदी प्राध्यापक वर्गाचा समावेश आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्टाफ असोसिएशन कमिटी मधील प्राध्यापकांसोबत संपर्क करावा व आपला फार्मसी प्रवेशाचा फॉर्म मोफत भरावा असे आवाहन स्टाफ असोसिएशन ने प्रसिद्धी पत्रकांसोबत बोलताना दिली.
बी. फार्म या पदवी अभ्यासक्रम साठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्या करीता मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि डी फार्म पदविका अभ्यासक्रम साठी 28 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे