मोताळा:- दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढत आहे. असाच एक प्रकार मोताळा तालुक्यातून उघडकीस आला आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या २९ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना मोताळा तालुक्यातील अंत्री येथे 11 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की पीडित महिला व तिचा भाऊ महालक्ष्मीचा प्रसाद घेण्यासाठी आलेला होता. महिलेला लघुशंका आल्याने ती घर पडलेल्या एका पडीत जागेत लघुशंके साठी बसलेली असताना गावातील सागर पुंडलिक जवरे हा त्या ठिकाणी आला व त्यांनी तिला कंडोम चे पाकीट दाखवून म्हणाला की मला तुझ्या सोबत करू दे…. पीडित महिलेने नकार दिल्याने त्याने छातीला जोरात ओरबडले व दगडाने डोक्यावर, पाठीवर व डाव्या हाताच्या खांद्यावर मारहाण केली असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सागर पुंडलिक जवरे रा. अंत्री ता. मोताळा याच्यावर कलम बी एन एस 75, 118 (1) 115 (2) सह गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
महिला लघुशंकेसाठी गेली तो तिथे आला….कंडोम चे पाकीट दाखवले अन् म्हणे मला तुझ्या सोबत करू दे.. मोताळा तालुक्यातील घटना
