शेगाव : तालुक्यातील जवळा पळसखेड येथील पत्रकार देविदास श्रीराम कळसकार (वय ४०) यांनी आपल्या राहत्या घरी छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.या बाबत ग्रामीण पोलिसांना सदर माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करुन नातेवाईक कैलास पांडुरंग कळसकार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पत्रकार यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती आहे.या घटनेने पत्रकार कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी तपास ग्रामीण पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण मेटांगे करीत आहेत.
पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या, शेगाव तालुक्यातील घटना!
