मलकापूरचे माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांची राजकारणातून निवृत्ती; ३२ वर्षांच्या प्रामाणिक सेवेला दिली निरोपाची भावना
मलकापूर( दिपक इटणारे ): मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नारायणदास निहलानी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी झोकून दिलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे. ३२ वर्षांचे समर्पित कार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी…
