
माझ्या मित्रा सोबत वाद का केला म्हणत चाकूने वार करून केले जखमी, खामगाव पोलिसात गुन्हा दाखल!
खामगाव : मित्रासोबत वाद का केला असे म्हणून युवकाने इसमास चाकुने पाठीवर मारुन जखमी केल्याची घटना शहरालगत वाडी येथील इंदिरा नगरात घडली. याबाबत संतोष शालीग्राम दामोदर वय ४५ रा. इंदिरा नगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, १६ऑक्टोंबर रोजी ते गावात ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. यावेळी गावातीलच अभिजीत गवई वय ३० हा तेथे…