Headlines

वादळी वाऱ्याने मलकापूर शहरासह तालुक्याला झोडपले; भिंत कोसळवून 12 मजूर जखमी, बसवर वीज कोसळली, मंदिराचा कळस पडून एकाचा मृत्यू, एकाच्या डोक्यावर झाड पडून मृत्यू, शहर पोलीस स्टेशनचे पत्रे उडाले

मलकापूर: विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात आज रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक घर व दुकानांची टिनपत्रे उडाली ‌झाडांच्या फांद्या पडल्या त्यामुळे रहदारी विस्कळीत झाली. तब्बल ४० मिनिटांच्या थरारात नागरिक अक्षरशः हादरले. पावसाळ्याची सुरुवात व्हायची आहे पण मान्सून सक्रिय झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याच दोन…

Read More

मलकापूर आगाराच्या बसवर वीज कोसळली, महिला कंडक्टर जखमी तर 10 ते 15 प्रवासी सुखरूप..

मलकापूर :- अकोल्यावरून मलकापूरकडे येत असलेल्या एम एच .07.सी 9217 क्रमांकाच्या बसवर वीज कोसळून एक महिला कंडक्टर जखमी झाली. तर बस मध्ये असलेले दहा ते पंधरा प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. मलकापूर आगाराची बस आज सायंकाळच्या सुमारास अकोल्यावरून मलकापूर कडे येत असताना आयटीआय कॉलेज जवळ आली असता बस वर वीज कोसळली. या घटनेत बसच्या वरील…

Read More

चार दिवस जगा पण वाघा सारखे म्हणजे संत भीमा भोई सारखे जगा – ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील

मलकापूर : रावणा सारखा श्रीमंत कोणी नाही वारकऱ्यासारखा सांप्रदाय नाही आणि शिवाजी महाराजांसारखा दुसरा छत्रपती होणे नाही. चारच दिवस जगा पण वाघा सारखा म्हणजेच संत भीमा भोई सारखा जगा असे प्रतिपादन ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील यांनी आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात केले. भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी भीमा भोई यांची 174 वी जयंती निमित्त ह.भ.प…

Read More

दुर्गा वहिनी राष्ट्रधर्म संस्कृतीचे रक्षणासाठी कटिबद्ध आहे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे यांचे प्रतिपादन

मलकापूर:- श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या विविध आयामांच्या संदर्भात पात्रता, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमांमुळे बजरंग दलाला देशभरात मान्यता मिळाली होती. त्याच्या गतिशील योगदानाचा परिणाम म्हणून, देशभरातील नव-युवक विहिंपकडे आकर्षित झाले. देशाच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण बजरंग दलात सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे मुलीही विहिंपकडे आकर्षित झाल्या.सेवा,सुरक्षा, संस्कार आणि गतिमानतेची भावना जागृत करण्यासाठी तसेच त्यांच्याशी संबंधित विविध समस्यांचे…

Read More

टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला अटक

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या एका गावातील ६ वर्षीय चिमुकलीवर २० वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिमुकलीच्या आईवडिलांनी माना पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. सहा वर्षीय चिमुकली ही २३ मे रोजी…

Read More

बहिणीच्या हळदीच्या दिवशी दोन भावांचा अपघातात मृत्यू, लग्नासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दिली धडक

घारोड : हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लग्नासाठी आवश्यक साहित्य आणण्याकरिता लाखनवाडा येथे गेलेले दोन युवक अज्ञात – वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना २३ मे रोजी सकाळी उघडकीस – आली. अपघात घारोड ते लाखनवाडादरम्यान २२ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. घारोड येथील येथील सम्राट – रामेश्वर इंगोले (वय १७ वर्ष) व अजय – प्रल्हाद इंगोले…

Read More

भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला उडवले,एकाचा जागीच मृत्यू

पिंपळगाव सराई : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला. ही घटना २२ मे रोजी रात्री सोनेवाडी येथे घडली. देविदास गजानन काळे (रा. सोनेवाडी, वय २३) असे मृतक युवकाचे नाव आहे. सोनेवाडी येथील देविदास काळे व शुभम तायडे हे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सोनेवाडीजवळील सिमेंट रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, त्यांना भरधाव दुचाकी…

Read More

कर्जाच्या चिंतेतून 73 वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :कर्जाच्या चिंतेतून ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली ही घटना तालुक्यातील कदमापूर येथे २३ मे रोजी उघडकीस आली. नारायण मुकाजी गुरव यांनी २३ मे रोजी पहाटे घरासमोर टिनपत्राच्या लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा…

Read More

पाइपलाइनच्या व शेतरस्त्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉडने हाणामारी, परस्पर तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल!

मोताळाः शेतरस्ता तथा पाण्याच्या पाइपलाइनच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि काठीने हाणामारी झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोटा येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा येथील रामेश्वर पुंडलिक सरोदे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठ…

Read More

सर्पदंशाने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू,१५ दिवसांपूर्वी झाला होता विवाह

वरवट बकाल-  येथील रंगाचा व्यवसाय करणारे व्यापारी संदीप शेषराव तेटू (वय ३१ वर्ष) हे नेहमी प्रमाणे वरवट बकाल बस थांब्यावरील रंगांच्या दुकानात २२ मे रोजी सकाळी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संदीप तेटू यांना प्रथम खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More