Headlines

डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट शिबिरासाठी पात्र

डिडोळा, मोताळा: महाराष्ट्र शासनांतर्गत भारत स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर येथे करण्यात आले. या शिबिरात सहा जिल्ह्यांतील 140 स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातून 33 विद्यार्थी सहभागी झाले.डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी पात्रता मिळवली. सम्राट सुधाकर गाडेकर, रितेश भगवान…

Read More

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा!

मंगरुळ नवघरे :- येथील तरुण गोविंद सुरेश गायकवाड वय २६ वर्ष रा. मंगरूळ नवघरे हा बाबुळगाव शिवारांमधील त्याच्या शेताला लागून असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी १० वाजताच्या उघडकीस आले. येथील शेतकरी संतोष छगन वाकडे हा सकाळी शेतामध्ये चक्कर मारत असताना एका आंब्याच्या झाडाला गोविंद गायकवाड हा गळफास घेऊन दिसून आल्यानंतर त्यांनी मंगरूळ येथील दीपक…

Read More

अवैध गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले, ३६.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; बोराखेडी पोलिसांची कारवाई!

मोताळा : महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २८ बीबी ७४९१ हा संशयित वाहन खामगाववरून मोताळा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलिसांनी बोराखेडी फाटा येथे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळून आला.या कारवाईत २५,८२,००० रुपये किमतीचा गुटखा आणि पिकअप वाहनाची किमत ११,००,००० रुपये…

Read More

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात शिक्षक गंभीर जखमी; अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल!

खामगाव :- टाकळी फाटा येथील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला असून, त्यात शिक्षक मोहन त्र्यंबक सालवे गंभीर जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.धडक दिलेल्या वाहनाचा क्रमांक एम. एच. १२ जीएफ ४४३९ असल्याचे…

Read More

ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी; मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- आज, दि.10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मलकापूर शहरातील मुंधळा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या वळणावर ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अजय रत्नाकांत पाटील (वय 37, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) यांचा मृत्यू झाला, तर प्रसाद भटू (वय 46, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) हे जखमी झाले.दोघेही मलकापूर येथे धान्य खरेदी…

Read More

मलकापूर कडून धरणगावकडे जात असतांना दीपनगर उड्डाणपुलावर अपघात: उमाळी येथील वृद्धाचा मृत्यू, तिघे जखमी

भुसावळ:- भुसावळ तालुक्यातील दीपनगर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री रिक्षा आणि ट्रकचा अपघात होऊन ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह पती-पत्नी जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की रमेश बुद्ध सारसर (वय ६२, रा. उमाळी, ता. मलकापूर) हे आपल्या जावई लखन गोविंदा पटोने (वय ३५) आणि मुलगी अंजली लखन पटोने यांच्यासोबत रिक्षा (क्रमांक MH…

Read More

अवैध गुटख्याच्या वाहतूक प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी!

मलकापूरः अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या प्रकरणातील आरोपीस आज ९ डिसेंबर रोजी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिली.या प्रकरणाची माहिती अशी की, ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर अवैध गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडून ८५ लाख ३६ हजार रुपयांचा…

Read More

पिकाला पाणी देण्यासाठी मोटर’ चालू करत असताना ‘शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव: तालुक्यातील राहुड शिवारात शेतातील इलेक्ट्रीक मोटर सुरू करताना शॉक लागून अशोक देविदास चव्हाण (४२) यांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी घटना ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. चव्हाण हे कुन्हा पारखेड येथील रहिवासी होते आणि शेताला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करत होते. यावेळी शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेबाबत चव्हाण यांच्या कुटुंबाने पिंपळगाव…

Read More

नियम धाब्यावर बसवून मलकापूरमध्ये नायलॉन मांजाची खुलेआम विक्री; कारवाईची गरज

मलकापूर ( उमेश ईटणारे ) :- शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची मलकापूर शहरात खुलेआम विक्री सुरू आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या नायलॉन मांजामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्याने मानवजातीसह पशु-पक्ष्यांचाही जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे या विक्रीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पतंग उत्सवात धोका वाढला.. तीळ संक्रांतीच्या…

Read More

अज्ञात ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला उडवले, एयर बॅग उघडल्या अन् दोघे गंभीर जखमी ; हॉटेल सूर्या नजीकची घटना

मलकापूर:- : शहरातील टाटा मोटर्स समोर एका अनोळखी ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. या घटनेत किरण मदत गि-हे (वय 36, रा. एटेनखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा) आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. ही घटना काल दि. 8 डिसेंबर रोजी 6 च्या सुमारास घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की…

Read More
error: Content is protected !!