
गव्हाला पाणी देताना रानडुकरांचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील घटना!
मोताळा :- शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकरी जखमी झाल्याची घटना कोथळी शिवारात घडली. जखमी हमीदखाँ समशेरखॉ (४६) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना ७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली. मक्याच्या पिकात लपलेल्या ५ ते ६ रानडुकरांनी अचानक हल्ला चढवून हमीदखाँ यांना जखमी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा…