
झोपलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे लंपास.. तिघांवर गुन्हा दाखल; खामगाव शहरातील घटना
खामगाव :- येथील बाळापुर नाका परिसरातील अजय हॉटेलसमोर १७ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. निलेश वसंतराव गव्हाळ (४१, रा. जगदंबा रोड) हे रात्री १२.३० वाजता बाजीवर झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजता जाग आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरीचा…