दुसरबीड : सिंदखेड राजा मेहकर राज्यमहामार्गावर दि.११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा येथील टोल नाक्याजवळ ट्रकने मोटार सायकला धडक दिली. यामध्ये विष्णू इंगळे हा ठार झाला तर दिपक गवई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली
याबाबत असे कि, ताडशिवणी येथील विष्णू इंगळे वय ४६ वर्ष व दिपक गवई वय ३५ वर्ष हे दोघे एम.एच. २८ बी. एस. ९७९२ या दुचाकीने काल सायंकाळी काही कामानिमीत्त राज्यमहामार्गाने दुसरबीडला जात होते. दरम्यान टोलनाक्याजवळ विरूध्द दिशेने – येणाऱ्या ट्रक एम. एच. ४६ बी बी ९५९५ क्रमांकाच्या चालकाने धडक देवून जखमी केले.जखमीना लगेच रुग्णालय सिंदखेडराजा येथे उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी विष्णु इंगळे मरण पावल्याचे घोषित केले तर दिपक गवई यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले. याबाबत मृतकाचा मुलगा समाधान विष्णू इंगळे याच्या फिर्यादीवरुन किनगावराजा राजा पोलीसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.