मोताळा :- तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर २५ नोव्हेंबर रोजी पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी रवी आव्हाड, विक्की अव्हाड, आणि अमोल अंभोरे यांना अटक करून १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.हल्ल्यात लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.सुनील कोल्हे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
मोताळ्यातील सुनिल कोल्हे हल्ला प्रकरणात तिघांना न्यायालयीन कोठडी!
