शेगाव : शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालया समोरून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ सप्टेंबर रोजी हरिदास तुलसिदास बायस्कर (४८) हे सामान्य रुग्णालयात कामानिमित्त आले असता त्यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच२८- एडी-३४३८ (किं.अ. ३० हजार रू.) रुग्णालयासमोर उभी केली होती. दरम्यान काम आटोपून परत आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही.यावेळी त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू मिळून आली नाही. त्यामुळे चोरट्याने दुचाकी चोरून नेली असल्याची तक्रार त्यांनी शहर पोस्टेला दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी व अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
उपजिल्हा रुग्णालयासमोरून दुचाकीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल! शेगाव येथील घटना
