नांदुरा : दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्यामुळे दुचाकी चालकाचा पायक्रॅक्चर झाल्याची घटना ३ ऑक्टोबरला स्थानिक शक्ती ले-आउट जवळ घडली. मलकापूर कडून नांदुराकडे दुचाकी स्वार सुभाष रघुनाथ रोहनकर रा. चांदुर बिस्वा हे आपली एमएच २८ एसी ४७५९ या क्रमांकाच्या दुचाकीने नांदुऱ्याला येत होते. यावेळी मलकापूरकडे जाणाऱ्या एमएच २८- बिडब्ल्य ६१०४ या क्रमांकाच्या कारने शक्ती लेआउट जवळ दुचाकीला जोरात धडक दिल्यामुळे दुचाकी स्वाराचा पाय फॅक्चर झाला. जखमीला प्राथमिक उपचार करता प्रथम डॉ. इंगळे यांच्या दवाखान्यात तर पुढील उपचाराकरिता मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी, नांदुरा येथील घटना!
