शेगाव:- घरून गावात असलेल्या शिकवणी वर्गाला जाणाऱ्या एका आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शेगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात ही घटना ९ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यावरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी राजेश उर्फ राजू डिगांबर विंचू याच्याविरोधात २० जुलै रोजी पहाटे विनयभंग, तसेच कलम ८ बाललैंगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पीएसआय गजानन शिंदे करत आहेत.
शिकवणी वर्गाला जात असलेल्या अल्पवयीन बालिकेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना
