मलकापूर :- शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला लाटण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. नात्यातील बेबी नीना घुले या शेतकरी महिलेला कापूस विक्रीच्या नावाखाली तब्बल ९ लाख १३ हजार ६०० रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. भालगाव (रण) येथील बेबी घुले यांनी मागील दोन वर्षांतील १११ क्विंटल ४० किलो कापूस अमोल बबन घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना विकला होता. त्यांनी ९ हजार प्रति क्विंटल या दराने एका महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिन्यानंतरही पैसे न मिळाल्याने बेबी घुले यांनी मागणी केली असता त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बेबी घुले यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.