( उमेश ईटणारे )
मलकापूर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मलकापुरात १० नोव्हेंबर रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. ही सभा जनता कला महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ होणारी ही सभा क्षेत्रातील मतदारांसाठी एक ऐतिहासिक संधी ठरणार आहे. महायुती पक्षाच्या वतीने मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सभेला भव्य प्रतिसाद मिळणार असा विश्वास आहे. मलकापूर शहरात या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सभेचा आयोजक कार्यकम शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण होईल याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे.मलकापूरच्या नागरिकांना या ऐतिहासिक सभेत सहभागी होऊन, परिवर्तनाच्या या लढाईत आपला सक्रिय सहभाग नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. भाजपाच्या विजयासाठी ही सभा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल, असे मत वर्तवले जात आहे.
