मलकापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 2022 घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये मलकापूर येथील अनिल पुंजाजी केणे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यासाठी त्यांनी योग्य नियोजन,सातत्य, संयम , प्रामाणिक प्रयत्न , चिकाटी , मेहनत ,यांचा मेळ घालुन अथक परिश्रमानंतर यश संपादन केले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
अनिल केणे हे मूळचे माता महाकाली नगर, मलकापूर चे रहिवासी असून त्यांचे प्राथमिक,व माध्यमिक शिक्षण लिं.भो.चांडक विद्यालय मलकापूर येथे झाले नंतर उच्च माध्यमिक शिक्षण गोविंदा विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर येथे झाले.
नंतर पदवीचे शिक्षण एम. जे . महाविद्यालय जळगाव येथे पूर्ण केले.
पदवीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून गरजू व होतकरू, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ध्येय करिअर अकॅडमी ची स्थापना केली. ध्येय करिअर अकॅडमीच्या माध्यमातू गरजू. होतकरू व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता प्रोत्साहन दिले. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी नियोजन सातत्य, संयम, प्रामाणिक प्रयत्न व चिकाटी च्या भरोशावर परिस्थितीवर मात करून
आपले पोलीस उपनिरीक्षक पदाचे ध्येय गाठले.
चौकट………
मला माझ्या आईचे व मोठ्या भावाच्या मेहनतीची जोड लाभली. माझ्या ताई व दाजीने कठीण काळामध्ये केलेले सहकार्य अनमोल ठरले. तसेच त्यांनी मला वेळोवेळी माझे ध्येय गाठण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.
मला माझ्या कुठल्याही परिस्थितीत सहकार्य लाभले. त्यामुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकलो.
त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील.
मी स्पर्धा परीक्षा ची करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, योग्य नियोजन सातत्य, संयम, प्रामाणिक प्रयत्न, करून आपण आपले ध्येय गाठू शकतो.
…… अनिल केणे
पोलीस उप निरीक्षक