उमेश ईटणारे
मलकापूर :- दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्या व वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. मलकापुरात काही दुचाकी वाहन चालकांकडून दुचाकीचे सायलेन्सर बदलवून तिला मॉडिफाइड सायलेन्सर बसविले आहे. या मॉडिफाइड सायलेन्सर मधून कर्कश आवाज येत असतो अश्या वाहनांमधून ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, ज्यादा तर मॉडिफाइड वाहन टवाळ खोर मुलांकडे आढळून येतात.शाळा,कॉलेज समोरून जातांना दुचाकी मधून फटाके फोडणे, मोठ्याने कर्कश आवाज करणे असे प्रकार आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी टवाळ खोराकंडून केले जात असतात,अशा मॉडिफाइड वाहनांवर व टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.