मलकापूर : घरासमोर उभी असलेली चारचाकी वाहन चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री शहरातील रामवाडी परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सोमवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रामवाडी परिसरात वास्तव्यास असलेले राजकुमार नारायण पाटील यांनी नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात त्यांची एम.एच.१२/एच.एन. ६५२७ क्रमांकाची चारचाकी उभी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्या अंगणातील चारचाकी वाहन दिसून आले नाही, आपले वाहन चोरी झाल्याचे लक्षात येताच राजकुमार पाटील यांनी शहर पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.त्यावरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.