( उमेश ईटणारे )
मलकापूर: मलकापूर नांदुरा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झालं आहे. भाजप आणि काँग्रेस यामध्ये सरळ लढत होणार असली तरी, मलकापूर नांदुरा मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार चैनसुखं संचेती यांचे नेतृत्व आणि कार्यक्षमता लक्षवेधक ठरत आहेत.चैनसुखं संचेती यांना मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची एकजुट आणि समर्पण पाहता, त्यांचा प्रचार दिनागणिक अधिक प्रभावी होतो आहे. ८ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या वतीने आयोजित युवा एकत्रिकरण महा रॅली मध्ये
शेकडो तरुणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि संचेती यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. रॅलीला सालीपुरा भागातून प्रारंभ करण्यात आला. आणि समारोप चांडक विद्यालयात उत्साही वातावरणात झाला, रॅलीमध्ये तरुणांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. ज्याने संचेती यांच्या प्रचाराची गती आणखी वाढवली. युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश संचेती आणि राहुल भैया संचेती यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मलकापूर नांदुरा मतदार संघातील प्रत्येक कोपऱ्यात संदेश पसरवून गेली. या रॅलीतून संचेती यांचे नेतृत्व एकजुटीचा प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.”कुणी कितीही करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय भावा,” अशी परिस्थिती दिसत आहे. संचेती यांच्या कार्यशक्तीने मतदार संघात एक सकारात्मक वळण घेतले आहे आणि त्यांच्या नावाने उत्साह आणि विश्वास निर्माण झाला आहे. संचेतींच्या विजयाची लाट फुलत चालली आहे, आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद याचा एक उत्तम उदाहरण आहे.वर्तमानात संचेती यांचे नेतृत्व मलकापूर नांदुरा मतदार संघात भविष्यातील संभाव्य विजयाच्या मार्गावर एक मजबूत ठसा निर्माण करीत आहे. त्यांच्या जिद्द, समर्पण आणि कार्याने संचेती यांच्या कडे विजयाचे वारे वाहत आहेत, आणि मतदार संघात एक नव्या आशेचा सूर सुरू झाला आहे.”संकटांना मात देऊनच चांगले दिवस येतात”, असं मानून संचेती यांच्या विजयाची प्रक्रिया आगामी निवडणुकीत एक ऐतिहासिक वळण घेईल.