Headlines

मलकापूर रेल्वे परिवारातर्फे आगळावेगळा उपक्रम, अपघातात मृत्यू पावलेल्या प्रायव्हेट सफाई कामगाराला 3 लाखांची मदत देऊन साजरा केला स्वतंत्रता दिवस!

मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतंत्रता दिवस कार्यक्रम रेल्वे स्टेशन मलकापूर येथे उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी स्टेशन प्रबंधक श्री डी वी ठाकूर, आरपीएफ इन्स्पेक्टर श्री राणाजी आणि वेगवेगळ्या विभागाचे डेपो इन्चार्ज आपल्या सहकर्मीसह उपस्थित होते स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे रेल्वेचे प्रायव्हेट सफाई सुपरवायझर स्वर्गीय अनिल जी डागोर यांचे 25 जून 24रोजी आकस्मिक रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला होता. रेल परिवार तर्फे डागोर परिवाराला मदतीचा हात म्हणून सहयोग राशी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि पाहता पाहता सहयोग राशीची रक्कम तीन लाख रुपये जमा झाली आज 15 ऑगस्ट24 स्वतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर या राशीची फिक्स डिपॉझिट चे प्रमाणपत्र स्टेशन प्रबंधक डी वी ठाकूर यांनी रेल परिवारातर्फे डागोर परिवाराच्या स्वाधीन केली. मलकापूर रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आणि रेल परिवारातर्फे एवढ्या मोठ्या रकमेची मदत करण्यात आली याकरिता स्टेशन प्रबंधक यांनी सगळ्यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!