Headlines

गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात बाप्पा झाले विराजमान

मलकापूर:- ( दिपक इटणारे ) गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये बाप्पा विराजमान झाले.

शनिवारपासून दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. भक्तिमय वातावरणात घराघरांत आणि लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले. मागील काही दिवसांपासूनच श्री गणरायाची मूर्ती घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये नेण्याची लगबग सुरू होती. ऑटो रिक्षा, कार, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांमधून बाप्पाला नेण्यात आले. यावेळी ढोल आणि ताशाच्या गजरात ठिकठिकाणी मिरवणुकाही पाहायला मिळाल्या. हातात आणि डोक्यावर गणेशाची मूर्ती ठेवून पायी जाणाऱ्यांची संख्याही फार मोठी गर्दी मलकापूर शहरात बघायला मिळाली. 8दिवस आधीपासूनच गणेशाची मूर्ती नेण्यास मोठ्या सार्वजनिक मंडळांनी सुरुवात केली होती. घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज सकाळपासून बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मलकापूर शहरात सहा अधिकारी, एस आर पी तुकडीतील 25 कर्मचारी सह एक अधिकारी, आरसीपी तुकडित पंचवीस कर्मचाऱ्यासह एक अधिकारी, 70 होमगार्ड शहरातील चौका चौकाचा मुख्य रस्त्यावर तैनात होते.

साऱ्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी मलकापूरकरांचे वेधले लक्ष

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर बाप्पाच्या विराजमानाचा दिवस आला. शहरातील सार्वजनिक मंडळांनी बाप्पांना थाटात माठात विराजमान होण्यासाठी ढोल पथके, डीजे असे अनेक आकर्षक वाद्य ठेवली होती. बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ ढोल ताशा व डीजे ने दुमदुमणारा आसमंत आणि त्यांच्यावर तरुणांनी धरलेला ठेका यामुळे मलकापूर शहरासह सगळीकडेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *