मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) नूतन इंग्लिश स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी देशसेवेत कार्यरत असलेले माझी सैनिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तालबद्ध कवायत सादर करत देशभक्तीपर गीत गायन केले.यावेळी शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले आणि शिक्षणाबरोबरच शिस्त, परिश्रम आणि देशभक्ती जोपासण्याचे आवाहन केले.