Headlines

इंजि.सौ.कोमलताई तायडे यांचा वाढदिवस वातानुकुलीत शवपेटी जनअर्पण करून केला साजरा!

 

मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) समाजकारण करतांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत जनक्रांती फाऊंडेशनच्या अध्यक्षा इंजि.सौ.कोमलताई सचिन तायडे यांनी वाढदिवसा निमित्त वातानुकुलीत शवपेटीच्या जनअर्पण प्रसंगी व्यक्त केले.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या जनक्रांती फाऊंडेशनच्या अध्यक्षा, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सचिन तायडे यांच्या पत्नी इंजि.सौ. कोमलताई सचिन तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जनसंपर्क कार्यालय डवले कॉम्प्लेक्स, डॉ.बर्‍हाटे यांचे हॉस्पीटल समोरील परिसरात स्व.आकाश तायडे मित्र परिवार व वरखेड यांच्या वतीने वातानुकुलीत शवपेटीचे जनअर्पण कार्यक्रम सौ.कोमलताई तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता. यावेळी सौ.कोमलताई तायडे यांनी सांगितले की, अनेकदा नातेवाईक, आप्तेष्ट हे लांब राहत असल्याने मृतकाला अनेक तास घरात ठेवावे लागते. अशावेळी वातानुकुलीत शवपेटी असणे गरजेचे असून शहरी भागात याची अडचण कमी येते. मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वातानुकुलीत शवपेटी मिळविण्यासाठी त्रास होतो. या बाबीचा विचार करून आम्ही वातानुकुलीत शवपेटी ग्रामीण भागातील जनतेसह सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देत असून या शवपेटीची गरज असलेल्या नागरिकांनी ९३२२८०५५१४ या नंबरवर संपर्क करून जनक्रांती फाऊंडेशनचे संपर्क कार्यालय, डवले कॉम्प्लेक्स, डॉ.बर्‍हाटे यांचे हॉस्पीटल समोर येथून घेवून जाणे व आणून ठेवणे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, जनक्रांती फाऊंडेशनचे अनेक सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!