Headlines

घरातील मोलकरीणच निघाली चोर! सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास; मलकापूर शहरातील धक्कादायक घटना

 

मलकापूर :- घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरीणीनेच घरमालकांची विश्वासघात करून सुमारे 6,96,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सौ. अपर्णा शैलेंद्र सदावर्ते (रा. ओमकार नगर, बुलडाणा रोड, मलकापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार, फिर्यादी यांच्या घरात राधा गणेश टावरी (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर) ही मागील चार महिन्यांपासून मोलकरीण म्हणून काम करत होती. रोजच्या प्रमाणे काम करत असताना, 14 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता तिने वॉशरूममध्ये जाण्याचा बहाणा करत वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश केला. त्याच वेळी, फिर्यादी यांच्या पतीने वरच्या रूममध्ये जाऊन पाहिले असता, राधा ही लोखंडी कपाटाचे लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी राधाने घाबरून काहीच चुकीचे करत नसल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर कपाटाची पाहणी केली असता बेडरूममधील लॉकरमधून 4 लाख रुपये रोख आणि 2,96,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले. यात सोनसाखळी, अंगठी आणि मंगळसूत्र यांचा समावेश आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ही चोरी 15 नोव्हेंबर 2024 पासून वेळोवेळी घडली असावी, असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी राधा गणेश टावरी हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!