Headlines

व्हॉईस ऑफ मीडियाची मलकापूर कार्यकारणी जाहीर.. निवडणूक घेऊन करण्यात आली निवड

 

मलकापूर : – पत्रकारांचे न्याय हक्कासाठी लढणारी देशव्यापी पत्रकारांची संघटना व्हॉईस ऑफ मिडियाच्या मलकापूर तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी रोजी संघटनेचे
राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे व जिल्हाध्यक्ष  सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुकाध्यक्षपदी धीरज वैष्णव तर शहर अध्यक्षपदी समाधान सुरवाडे, कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचे नेटवर्क पसरविलेले, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना देशभरात क्रमांक एकची संघटना म्हणून ओळखली जाते. पत्रकार विकास मंडळ असो व पत्रकारांच्या विविध मागण्या, न्याय व हक्का साठी सरकारशी एक प्रकारे भांडून पत्रकार आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेची आहे. तसेच शहरात सुद्धा व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून गतकाळात अनेक समाज उपयोगी तथा पत्रकार हिताचे उपक्रम सुद्धा राबविण्यात आले आहेत. अशा या संघटनेचे मलकापूर तालुका व शहर कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा कार्यकारणी गठित करण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते विजय डागा यांच्या फार्म हाऊस वर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, विदर्भ उपाध्यक्ष वीरसिंह दादा राजपूत यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन, निवडणूक प्रक्रियेद्वारे कार्यकरणी घोषित करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने तालुका अध्यक्षपदी धीरज वैष्णव शहराध्यक्षपदी समाधान सुरवाडे व कार्याध्यक्षपदी विलास खर्चे यांची निवड झाली. तसेच राजेश इंगळे तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत तालुका सचिव, अशोक रावणकार शहर उपाध्यक्ष, गौरव खरे सचिव, स्वप्निल आकोटकर सहसचिव, प्रवीण राजपूत कोषाध्यक्ष, शेख जमीन संघटक, भिवा चोपडे कार्यवाह, कैलास काळे प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली. याप्रसंगी नव्याने सदस्य झालेले पत्रकार विनायक तळेकर, अनिल उदगे, रामेश्वर गोरले, निखिल चीम यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शेतकरी नेते दामोदर शर्मा, सामाजिक कार्यकर्ते विजय डागा, वरिष्ठ पत्रकार हनुमान जगताप, नितीन पवार, मनोज पाटील, विजय वर्मा, अक्षय थीगळे, डॉ. सुभाष तलरेजा यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.नितीन भुजबळ यांनी केले तर आभार राजेश इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!