मलकापूर :- तालुक्यात जांभूळधाबा, आळंद, दूधळगाव गाव येथे अग्रिस्टक योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला. या ठिकाणी मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाची उपस्थिती होती. सर्व शेतकरी बांधव यांना अग्रिस्टॅक योजनेबाबत माहिती देण्यात आली. भविष्यात शेतकरी यांना मिळणारे अनुदान, विमा योजना, शेतकरी विभागाचे कृषी विषयक योजना करीता फॉर्मर आयडी आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्री राहुल तायडे याच्यातर्फे करण्यात आले सदर कार्यक्रमाचे ठिकाणी तलाठी श्री. शिवानंद काळे तसेच तलाठी कविता हेलोडे, सीएससी सेंटर धारक व गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आली. गावातील शिवरस्ते शेत रस्ते बांधन रस्ते इत्यादी मोकळे करण्याबाबतचे आव्हान सुद्धा करण्यात आले आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तात सुद्धा रस्ते मोकळे करण्यात येतील. अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळेस रस्त्याची अडचणी सादर केल्या त्याबाबत तात्काळ मंडळाधिकारी तलाठी देऊन मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार यांनी केले.