मलकापूर : दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, म्हैसवाडी येथे विद्यार्थ्यांचा ‘गुणदर्शन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निनिमा भुजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सौ. निलिमा सजगुरु पोळ आणि अविनाश दत्तात्रय पांचाळ यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. यासोबतच संतोश झगडू यांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमास विनोद रोहकले, शालेय समिती अध्यक्ष शंकरराव डिडगे, तसेच गावातील मान्यवर नागरिक व पालकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थितांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.